Astrology Zodiac Horoscope Aries Wkn.htm

Notifications

मेष मेष
स्वाभाविक गुणदोष

मेष ‍राशिच्या लोक स्वतला अधिक विद्वान समजतात. पण धर्म व व्यक्तीगत क्षमतांवर ते द्विधा मनस्धितीत असतात. या लोकांना आपला अपमान सहन होत नाही. घरात नेहमी कोणत्यातरी व्यक्तीबरोबर यांचे पटत नाही. वाद विवाद कराताना यांना लवकर जोश येतो. या राशिच्या लोकांचा अनेकवेळा नको त्या व्यक्तींबरोबर संबंध येतो त्यामुळे ते अनेक वेळा अडचणीत सापडतात. आपण बर्‍याचदा त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करता व यामुळे नंतर आपल्याला पश्चाताप करावा लागतो. कित्येक वेळा आपण वरवरचा व अवास्तविक दृष्टीकोन मांडता. लहान लहान गोष्टींमधून उद्भवणा-या मतभेदांना वाढवू नये. आपल्या आसपासच्या लोकांना आपल्या तर्क-कुतर्कांपासून प्रभावित करू नये. हे लोक आपली चुक झाली तरी कधीच ती मान्य करत नाही. त्यामुळे जोपर्यंत त्यांना मोठे नुकसान होत नाही तोपर्यंत ते आपली चुक मान्य करत नाही. प्रेमाच्या बाबतीत हे लोक दुसर्‍या लोकांना मूर्ख बनवतात. ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः या मंत्राचे यांनी 10,000 वेळा जाप करावा मनोकामना पूर्ण होइल.

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.