Astrology Zodiac Horoscope Saggitarius Bus.htm

Notifications

धनु धनु
व्यवसाय

धनु राशिच्या लोकांनी व्यापार धंदा भागिदारी न करात केला तर ते उत्तम राहिल. भागिदारीत आपल्याला संकटांना तोंड द्यावे लागेल. अभिमानाला ते पैशापेक्षा जास्त मानतात. या राशिच्या लोकांनी कोणत्याही एक धंदा निवडावा व तोच कायम ठेवावा, सतत व्यवसायचा क्षेत्रात बदल केला तर फायदा होणार नाही.

56 Bhog List ५६ भोग म्हणजे काय?, छप्पन भोग अर्पण करण्यामागची पौराणिक कथा

56 Bhog List ५६ भोग म्हणजे काय?, छप्पन भोग अर्पण करण्यामागची पौराणिक कथा५६ भोग म्हणजे हिंदू धर्मात भगवान श्रीकृष्णाला (विशेषतः जन्माष्टमी किंवा इतर सणांच्या वेळी) नैवेद्य म्हणून अर्पण केले जाणारे ५६ प्रकारचे वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि पक्वान्न होय. पौराणिक मान्यतेनुसार, माता यशोदा बालकृष्णाला दिवसातून आठ प्रहर (८ वेळा) भोजन किंवा वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायची. एकदा जेव्हा इंद्र देवाच्या कोपामुळे गोकुळावर मुसळधार पाऊस आला, तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या कनिष्ठ बोटावर उचलून गोकुळवासीयांचे रक्षण केले. सात दिवस आणि सात रात्र श्रीकृष्ण न जेवताच पर्वताखाली उभे होते. नंतर, गोकुळवासीयांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आठ प्रहर प्रमाणे ७ दिवसांचे मिळून (८ × ७ = ५६) ५६ प्रकारचे वेगवेगळे पक्वान्न श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण केले. तेव्हापासून ५६ भोग देण्याची परंपरा सुरू झाली.