Astrology Zodiac Horoscope Gemini Hlt.htm

Notifications

मिथुन मिथुन
आरोग्य

या ‍राशिच्या लोकांचे शरीर दिसायला धष्टपुष्ट असते मात्र आरोग्य मात्र मध्यमच असते. त्यांना जीवनात मानासिक कष्ठ जास्त करावे लागतात. त्यामुळे या राशिच्या लोकांना जास्तकरून स्नायु संबंधी रोग जास्त होतात. त्यांना कोणतातरी असाध्य रोग होण्यची भिती असते किंवा छातीत दुखणे व ह्रदय विकार होण्याची भिती असते. पित्त होईल असे सेवन करू नये त्रिफळा चूर्ण सुंठ आले व तुळशी चा काढा प्यावा पडून जखम होण्याची शक्यता जास्त आहे. सर्दी डोके दुखणे दात किंवा डोळ्यांचा त्रास होण्याची शक्यता अधिक आहे.

56 Bhog List ५६ भोग म्हणजे काय?, छप्पन भोग अर्पण करण्यामागची पौराणिक कथा

56 Bhog List ५६ भोग म्हणजे काय?, छप्पन भोग अर्पण करण्यामागची पौराणिक कथा५६ भोग म्हणजे हिंदू धर्मात भगवान श्रीकृष्णाला (विशेषतः जन्माष्टमी किंवा इतर सणांच्या वेळी) नैवेद्य म्हणून अर्पण केले जाणारे ५६ प्रकारचे वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि पक्वान्न होय. पौराणिक मान्यतेनुसार, माता यशोदा बालकृष्णाला दिवसातून आठ प्रहर (८ वेळा) भोजन किंवा वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायची. एकदा जेव्हा इंद्र देवाच्या कोपामुळे गोकुळावर मुसळधार पाऊस आला, तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या कनिष्ठ बोटावर उचलून गोकुळवासीयांचे रक्षण केले. सात दिवस आणि सात रात्र श्रीकृष्ण न जेवताच पर्वताखाली उभे होते. नंतर, गोकुळवासीयांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आठ प्रहर प्रमाणे ७ दिवसांचे मिळून (८ × ७ = ५६) ५६ प्रकारचे वेगवेगळे पक्वान्न श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण केले. तेव्हापासून ५६ भोग देण्याची परंपरा सुरू झाली.