Astrology Zodiac Horoscope Libra Lov.htm

Notifications

तूळ तूळ
प्रेम संबंध

तूळ राशिचे लोक विवाहाचा ‍निर्णय घेण्याआधी त्यांचा कल एकापेक्षा अधिक संबंधांकडे असेल. आपण प्रकृतीपासून प्रभावित आहात व मित्र बनवण्यात कुशल आहात. कधीकधी प्रेम प्रकरणांमुळे आपली मैत्री प्रभावित होईल. प्रेमप्रकरणात पुढाकार घेऊ नका व विवाहाचा निर्णय देखील विचार करून घ्या. या राशिचे लोक हे दयाळू बुध्दिवान तसेच सावध असलेल्या व्यक्तीशीच प्रेम करतात. ते कोणत्याही असाधारण घटनेला तसेच अनुभवाला झेलू शकतात या राशिचे लोक नेहमी वैभवात राहणे पसंत करतात: वृश्चिक राशि बरोबर असलेले त्यांचा प्रेम प्रकरण हे ईर्ष्यालु तसेच संदेहपूर्ण असते. सिंह राशि बरोबर त्यांचे प्रेम हे अधिक स्फूर्तिमय, नाटकी तसेच प्रदर्शनिय असते. धनु बरोबर त्यांचे प्रेम हे यशस्वी होऊ शकते.

56 Bhog List ५६ भोग म्हणजे काय?, छप्पन भोग अर्पण करण्यामागची पौराणिक कथा

56 Bhog List ५६ भोग म्हणजे काय?, छप्पन भोग अर्पण करण्यामागची पौराणिक कथा५६ भोग म्हणजे हिंदू धर्मात भगवान श्रीकृष्णाला (विशेषतः जन्माष्टमी किंवा इतर सणांच्या वेळी) नैवेद्य म्हणून अर्पण केले जाणारे ५६ प्रकारचे वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि पक्वान्न होय. पौराणिक मान्यतेनुसार, माता यशोदा बालकृष्णाला दिवसातून आठ प्रहर (८ वेळा) भोजन किंवा वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायची. एकदा जेव्हा इंद्र देवाच्या कोपामुळे गोकुळावर मुसळधार पाऊस आला, तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या कनिष्ठ बोटावर उचलून गोकुळवासीयांचे रक्षण केले. सात दिवस आणि सात रात्र श्रीकृष्ण न जेवताच पर्वताखाली उभे होते. नंतर, गोकुळवासीयांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आठ प्रहर प्रमाणे ७ दिवसांचे मिळून (८ × ७ = ५६) ५६ प्रकारचे वेगवेगळे पक्वान्न श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण केले. तेव्हापासून ५६ भोग देण्याची परंपरा सुरू झाली.