Astrology Zodiac Horoscope Libra Hom.htm

Notifications

तूळ तूळ
घर-परिवार

या राशिच्या लोक सामान्यत: आपल्या घराबाबत बरेच सावधान राहतात परंतु ते स्वच्छ ठेवणे त्यांच्यासाठी कठीण काम आहे. आपल्याला घरात फुले ठेवणे आवडते. आपल्या स्वयंपाक घरात आधुनिक उपकरणे व परंपरागत वस्तु यांचा संयोग असावा. या लोकांचा जन्म जर दुपारच्या वेळी किंवा मध्यरात्रीआधी झाला असेल तर त्यांना वडिलांचे सुख कमी मिळते. यांना मुलांचे सुख पण कमी मिळते. तसेच त्यांना मुलांच्या बाबतीत सतत काळजी घ्यावी लागते. या राशिच्या लोकांच्या कुटुंबात सतत काही ना काही संकटे येत असतात. आपल्या घरात सावत्र आई किंवा सावत्र भाऊ असण्याची शक्यता आहे. जीवनाच्या मध्यंतरी हे मातृहीन होण्याची शक्यता आहे. यांना मदत करणारे खुप आहेत पण यात असाही एक निघेल की तो मतद करण्याचे नाटक करून आपले खुप मोठे नुकसान करेल.

56 Bhog List ५६ भोग म्हणजे काय?, छप्पन भोग अर्पण करण्यामागची पौराणिक कथा

56 Bhog List ५६ भोग म्हणजे काय?, छप्पन भोग अर्पण करण्यामागची पौराणिक कथा५६ भोग म्हणजे हिंदू धर्मात भगवान श्रीकृष्णाला (विशेषतः जन्माष्टमी किंवा इतर सणांच्या वेळी) नैवेद्य म्हणून अर्पण केले जाणारे ५६ प्रकारचे वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि पक्वान्न होय. पौराणिक मान्यतेनुसार, माता यशोदा बालकृष्णाला दिवसातून आठ प्रहर (८ वेळा) भोजन किंवा वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायची. एकदा जेव्हा इंद्र देवाच्या कोपामुळे गोकुळावर मुसळधार पाऊस आला, तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या कनिष्ठ बोटावर उचलून गोकुळवासीयांचे रक्षण केले. सात दिवस आणि सात रात्र श्रीकृष्ण न जेवताच पर्वताखाली उभे होते. नंतर, गोकुळवासीयांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आठ प्रहर प्रमाणे ७ दिवसांचे मिळून (८ × ७ = ५६) ५६ प्रकारचे वेगवेगळे पक्वान्न श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण केले. तेव्हापासून ५६ भोग देण्याची परंपरा सुरू झाली.