Astrology Zodiac Horoscope Leo Frnd.htm

Notifications

सिंह सिंह
इष्ट मित्र

सिंह राशिवाल्यांचे मेष, कर्क, मिथुन, वृश्चिक व धनु राशीच्या व्यक्तींबरोबर ‍मैत्रीपूर्ण संबंध असतात कारण या सर्व व्यक्ती आपल्या स्वभावाला व इच्छांना समजून आहेत. वृषभ तूळ मकर कुंभ राशिच्या लोकांकडून यांची हानी होऊ शकते. तसेच ‍आपल्या राशितील व्यक्ती आपल्याशी कसे वागतो यावर त्याच्याशी आपले संबंध अवलंबून आहेत. हे लोक आपल्या मित्रांवर खुप प्रेमाने वागतात, त्यामुळे यांची मित्रसंख्या भरपूर असते. मेष राशिच्या लोकांकडून यांना चांगले मार्गदर्शन व प्रेरणा मिळेल.

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.