Astrology Zodiac Horoscope Leo Chr.htm

Notifications

सिंह सिंह
स्वाभाविक वैशिष्ठे

सिंह राशिचे लोक हे निर्भिड व विवेकशील असतात. आपला स्वभाव आशावादी आहे. ही माणसे प्रामाणिक, निष्कपटी, सरळ स्वभावाची व खरे बोलणारी असतात. यांना सतत बोलणे आवडते, यांचा स्वभाव उद्यमशील असतो. व यांना इतरांवर शासन करणे पसंत असते. हे स्वार्थी अहंकारी व घमंडी व दुसर्‍यावर बळजबरीनी शासन करायला आवडते. यांना एकांत आवडतो. यांच्या बोलण्यातून दुसरे लोक दुखावले जातात. हे लोक नेहमी आपले वेगळे व्यक्तीमत्व बनवण्याचा प्रयत्न करत असतात. आपली कामे आपणच करणे हे पसंत करतात.

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.