Astrology Zodiac Horoscope Cancer Hlt.htm

Notifications

कर्क कर्क
आरोग्य

या राशिचा प्रभाव छाती स्तन पोट जठर गुदा यांच्यांवर असतो त्यामुळे यांसंबंधीचे रोग उत्पन्न होण्याचा धोका नेहमी असतो. या राशिच्या लोकांना सारखी सर्दी होत असते. यांचे शरीर हे दुर्बल असते. या राशिच्या लोकांना जास्तकरून पचनसंस्थेचे रोग, मानसिक दुर्बलता व जलोदर रोग यांनी त्रस्त असतात. चंद्राचा प्रभाव कमी झाल्यावर त्यांना निद्रा नाशा होते. या राशिच्या लोकांना 42 ते 49 वर्षांच्या काळात मूत्र संबंधी रोग होण्याची शक्यता असते. जेवण्यात वेगवेगळे पदार्थ खाण्याकडे यांचा कल असतो. कमी खाणे यांच्यासाठी लाभदायक आहे. या राशिच्या महिलांना प्रसुतिच्यावेळी जास्त त्रास होतो. यांचे मन हे जास्त संशयग्रस्त असते.

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.