Astrology Zodiac Horoscope Cancer Frnd.htm

Notifications

कर्क कर्क
इष्ट मित्र

कर्क राशिवाल्याची मैत्री वृषभ,मीन व कन्या सूर्यराशीच्या व्यक्तींबरोबर फळते फूलते. या राशींचे मित्र नेहमी आपल्या बरोबर राहतात व मदतीची आवश्यकता असल्यास धावून येतात. कर्क राशिच्या लोकांनी आपल्याच राशिच्या लोकांबरोबर कोणतेही संबंध ठेऊ नयेत. त्याचबरोबर मेष तूळ मकर राशिवाल्या लोकांबरोबर यांचे पटत नाही. वृश्चिक व मीन राशिच्या लोकांबरोबर जोपर्यंत ते एक दुसर्‍याचा मान राखतात तोपर्यंतच त्यांचे पटते. वृषभ कन्या व मकर यांच्या बरोबर चांगले संबंध बनु शकतील. मेष वृषभ मकर व कुंभ राशिच्या लोकांबरोबर शत्रुता लवकर निर्माण होते.

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.