1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
  4. mangala-gauri pooja

सोनपावले नववधू ती आली

mangala-gauri
सोनपावले नववधू ती आली,
घरची ती आता गृहलक्ष्मी झाली,
सणवार तीचे करावे,खूप कौतुकाने,
उजळून निघेल घर आपले आनंदाने,
आज आहे सखी तीची मंगळागौर,
आणून पत्री, आणिलें फुलं, काढिली गौर,
वाळूचा महादेव काढून पूजिले सख्या सवे,
करून जागरण, खेळून खेळ मनोभावे,
दिधले वाण, करून आरती महादेवा आळविले,
मंगळागौरी चे हे पावन पर्व साजरे केले!
...अश्विनी थत्ते
पुढील लेख
जन्माष्टमी विशेष : वैभव, यश, सौभाग्य आणि कीर्ति प्रदान करणारे भगवान श्रीकृष्णाचे 108 नावे