1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Maharashtra received five awards under PM Swanidhi Samman Puraskar 2026

पीएम स्वनिधी पुरस्कार २०२६ अंतर्गत महाराष्ट्राला पाच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

पथविक्रेत्यांची उपजीविका बळकट करणे, त्यांना संस्थात्मक कर्ज उपलब्ध करून देणे आणि डिजिटल वित्तीय समावेशनाला प्रोत्साहन देणे यांसारख्या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६ अंतर्गत पाच पुरस्कार मिळाले आहे. राज्य सरकारला दोन पुरस्कार मिळाले, तर महाराष्ट्रातील तीन शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना कर्ज वितरणातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल आणि केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज वितरणात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला, तर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात राज्याने दुसरा क्रमांक मिळवला. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या श्रेणीत, एक ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कर्ज वितरणात परभणी महानगरपालिकेने प्रथम स्थान मिळवले. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत परळी नगर परिषदेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने तिसरे स्थान मिळवले आहे. राज्य सरकार, नगर विकास विभाग, नगर परिषद प्रशासन संचालनालय, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, बँकिंग संस्था आणि इतर संबंधित संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे यश प्राप्त झाले आहे.

पीएम स्वनिधी योजना काय आहे?
प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ही केंद्र सरकारची योजना आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने जून २०२० मध्ये सुरू केलेली ही योजना, रस्त्यावरील विक्रेत्यांना कोणत्याही हमीशिवाय परवडणारे खेळते भांडवल कर्ज उपलब्ध करून देते.

पुढील लेख
आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर ट्रकची स्कूल बसला धडक, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू तर ३५ जखमी