संबंधित माहिती
- पुण्यातील हिंजवडी येथील विप्रोमध्ये टीसीएस सारख्याच प्रकार घडल्याचा माजी कर्मचाऱ्याचा दावा
- पुणे महावितरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाचखोरी प्रकरणात अटक
- पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची फसवणूक; ७०० नोकऱ्या गेल्या, रातोरात कंपनी बंद झाली
- पुण्यात नाशिकसारखे टीसीएस प्रकरण उघडकीस! विप्रोमध्ये महिलेवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव
- पुण्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; आयुर्वेदिक डॉक्टरसह दोघांना अटक
पुणे: गॅस गळतीमुळे भीषण स्फोट; एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू
पुण्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. घरगुती गॅस गळती झाल्याचे लक्षात येताच सिलिंडर बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र देवघरातील पेटत्या दिव्यामुळे अचानक मोठा स्फोट झाला.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील खांडवे नगरमध्ये नवीन एलपीजी गॅस सिलेंडर बसवताना झालेल्या गॅस गळती आणि स्फोटात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पहिल्या मजल्यावरून उडी मारून एक ६ वर्षांची मुलगी थोडक्यात बचावली.
शुक्रवारी सकाळी पुण्यातील खांडवे नगर परिसरातील एका घरात एलपीजी गॅस सिलेंडर बदलताना मोठा स्फोट झाला. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला, तर एक व्यक्ती गंभीररित्या भाजली असून मृत्यूशी झुंज देत आहे. या भीषण घटनेत, एका ६ वर्षांच्या मुलीने प्रसंगावधान दाखवत पहिल्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव वाचवला.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, घरातील आधीचा एलपीजी सिलेंडर संपल्यानंतर नवीन सिलेंडर बसवला जात होता. गॅस गळती झाली आणि तो संपूर्ण खोलीत पसरला. थोड्याच वेळात मोठा स्फोट झाला. यामुळे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
या दुर्घटनेत विष्णू गीते (६०), रुंदिवनिका विष्णू गीते (५०) आणि पांडुरंग विष्णू गीते (३५) हे गंभीररित्या भाजले. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या दुःखद घटनेत, सहा वर्षांच्या निहारिका गीतेच्या प्रसंगावधानाने तिचा जीव वाचला. आग आणि धुराने वेढलेल्या निहारिकाने पहिल्या मजल्यावरून उडी मारली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगीत फ्लॅटचा हॉल पूर्णपणे जळून खाक झाला. फर्निचर, टेलिव्हिजन, विजेची वायरिंग आणि इतर घरगुती वस्तू नष्ट झाल्या.
Edited By- Dhanashri Naik