5 रुपये खर्चल्यामुळे आईने चिमुकल्याला दिले चटके
आई आपल्या लेकरासाठी काहीही करायला तयार असते पण उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये एका क्रूर आईने पाच रुपयांसाठी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. तिने आपल्याच निष्पाप मुलाला तालिबानी शिक्षा दिली. तिने गरम सुरीने त्याच्या दोन्ही पायांचे तळव्याला चटके दिले. मग, त्याला रडत सोडून ती पार्टी करायला निघून गेली.
या कलियुगातील आईने मुलाच्या तळपायांना गरम सुरीने चटके दिले, त्याला एका खोलीत कोंडून ठेवले आणि स्वतः वाढदिवसाच्या पार्टीला निघून गेली.
मिळालेल्या माहितीनुसार, राधानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलवामऊ गावचा रहिवासी असलेला व्यक्ती , इंदूरमध्ये एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. त्याची पत्नी आणि मुलगा गावात राहतात. पत्नीने मुलाला २० रुपये दिले आणि गुटका मागवला. मुलाने १५ रुपयाचा गुटका विकत घेतला आणि ५ रुपयांची चॉकलेट घेऊन खालली. घरी आल्यावर आईने ३ गुटके पाहून संतापली.
त्या बाईने आधी मुलाला बेदम मारहाण केली आणि नंतर गॅसवर चाकू तापवून त्याचे दोन्ही तळवे वाईट रीतीने भाजले. यानंतर, तिने मुलाला एका खोलीत कोंडून बाहेरून कुलूप लावले आणि स्वतः शेजारी वाढदिवसाच्या पार्टीला निघून गेली.
थोड्या वेळाने शेजारचा मुलगा त्याला शोधत घरी आला आणि त्याने पीडित मुलाला रडताना पहिले आणि पीडित मुलाने घडलले सर सांगितले. माहिती मिळतातच शेजारचे सगळे धावत आले आणि कुलूप उघडायला सांगितले. घरात आल्यावर त्यांनी बघितले की, मुलाचे पाय भाजले होते.
ही घटना कळताच, वडील इंदूरहून मुलाच्या घरी धावत आले. पत्नीचे कृत्य ऐकून आणि मुलाची अवस्था पाहून, त्यांनी तिच्यावर पोलीस कारवाईची मागणी केली. सध्या, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे.
मुलाच्या वडिलांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीने त्यांच्या आईलाही मारहाण केली होती.
पतीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
Edited By - Priya Dixit