1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
  4. Chocolate Bread Donuts Recipe

ब्रेड आणि चॉकलेटपासून बनवा टेस्टी डेजर्ट Chocolate Bread Donuts Recipe

मऊ, चॉकलेटी आणि खूप चविष्ट ब्रेड-स्टाइल चॉकलेट ब्रेड डोनट्स रेसिपी घरच्या घरी सहज बनतात!
 
साहित्य-
मैदा – 2 कप
साखर – ⅓ कप
कोको पावडर – ¼ कप
बेकिंग पावडर – 1½ टीस्पून
बेकिंग सोडा – ½ टीस्पून
मीठ – एक चिमूटभर
लोणी (मऊ) – ¼ कप
दूध – ¾ कप
अंडी – 1 मोठे
व्हॅनिला एसेन्स – 1 टीस्पून
चॉकलेट चिप्स (ऑप्शनल) – 2-3 टेबलस्पून
ग्लेझसाठी (ऑप्शनल):
पावडर शुगर – 1 कप
कोको पावडर – 2 टेबलस्पून
दूध किंवा क्रीम – 2-3 टेबलस्पून
व्हॅनिला – थोडीशी
 
कृती-
सर्वात आधी कोरडी साहित्य एकत्र गाळून घ्या, आता मैदा, कोको पावडर,  बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ,  साखर मिसळा. आता  एका बाऊलमध्ये लोणी, अंडी, दूध आणि व्हॅनिला चांगले मिसळा. ओले साहित्य कोरड्या साहित्यात टाकून मऊ बॅटर तयार करा. (जास्त फेटू नका). चॉकलेट चिप्स असल्यास आता मिसळा. आता डोनट पॅनमध्ये (किंवा मफिन ट्रेत) ग्रीस करा. आता बॅटर भरा (¾ भाग). टूथपिक स्वच्छ निघेपर्यंत प्रीहीटेड ओव्हन 180°C वर 12-15 मिनिटे बेक करा. थंड झाल्यावर ग्लेझ लावा.आता  पावडर शुगर, कोको, दूध मिसळून स्मूथ ग्लेझ तयार करा आणि डोनट्सवर ओता. चला तर तयार आहे खूप चॉकलेटी आणि मऊ अशी चॉकलेट ब्रेड डोनट्स रेसिपी. 
 
टिप्स
अधिक सॉफ्ट हवे असल्यास 1 टेबलस्पून दही टाकू शकता.
फ्राई करायचे असल्यास थोडे जाड बॅटर करून गरम तेलात खोलून तळा.
एअरफ्रायरमध्ये 160°C वर 8-10 मिनिटे करता येते.
2 दिवस एअरटाइट डब्यात टिकते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
पुढील लेख
Crispy Cauliflower Cutlet Recipe चटपटीत आणि खमंग स्टार्टर रेसिपी ''कुरकुरीत फ्लॉवर कटलेट''