1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whats app message

मातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...

whats app message
निरंतर माळेतून एक मोती गळतो आहे, 
तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे ..
 
काही चेहरे वजा अन बर्‍याच आठवणी जमा, 
वयाचा पक्षी आभाळी दूर उडतो आहे ..
 
हलकी हलकी उन्हे अन आक्रसलेल्या रात्री, 
गेलेल्या क्षणांवर पडदा हळूहळू पडतो आहे...
 
मातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी, 
हर मुद्द्यावर इतका का अडतो आहे...
 
अनुभवण्यापूर्वीच सुटून जात आहे आयुष्य, 
एक एक क्षण जणू ढग बनून उडतो आहे.. 
 
तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे ..
पुढील लेख
अमृताचा 'कानाला खडा'