1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
  4. unlucky numbers as per numerology

हे तीन अंक मानले गेले आहेत अशुभ, आपला मूलांक तर यात सामील नाही?

अंक ज्योतिष एक पूर्ण आणि चमत्कारिक शास्त्र आहे. हे शास्त्र अंकांचे रहस्य बारकाईने अध्ययन करून भविष्याबद्दल सांगतं. अंक ज्योतिषाचे नऊ अंक नऊ ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात. यातून काही अंक गुढ आहेत आणि धोकादायक व अशुभ देखील मानले गेले आहेत. जाणून घ्या त्याबद्दल:
 
अंक 3
तसं तर 3 हा अंका गुरुचा असतो. या अंकाचा प्रभाव जातकाला मेधावी आणि विद्वान बनवतं परंतू हा अंक नेहमी शुभ फलदायी ठरत नाही. या अंकात अनेक अपघात झाल्याचा इतिहास आहे. या अंकाचे लोकं दक्ष असले तरी त्यांच्या करिअरमध्ये अडथळे निर्माण होतात. 3 अंक असणाऱ्यांना अधिकश्या कौटुंबिक समस्यांना सामोरं जावं लागतं.
 
अंक 4
राहूचा हा अंक सर्व अंकांमध्ये सर्वात अधिक रहस्यमय आहे. 13 नंबर अशुभ म्हटला जातो त्याचे कारण 13 चा जोड 4 आहे. 4 अंक सर्वाधिक वेदना देणारा अंक आहे. या अंकात पैदा होणारे जातकांमध्ये अनेक क्षमता असून ते गुढ असतात. यांना जीवनात अनेक चढ- उतार बघायला मिळतात. यश देखील लवकर हाती येत नाही. त्यांचा खोलपणा भरून काढणे सोपे नाही.
 
अंक 8
या अंकात मोठे दहशतवादी हल्ले, युद्ध, भूकंप, पूर बघितले गेले आहेत. तसं तर हा अंक व्यावसायिक लोकांना यश प्रदान करणारे आहे. परंतू यांच्या जीवन अपार कष्ट बघायला मिळतं. आरोग्यदृष्ट्या देखील 8 अंक असणारे परेशान असतात. या अंकाच्या लोकांना जीवनात अनेक धोके मिळतात. कोणत्याही देशाच्या संदर्भात बघायला गेलो तर हा अंक अनेक अपघातांचा साक्षीदार राहिला आहे.
पुढील लेख
बर्थ डेट अनुसार वास्तू उपाय