UAE मध्ये अनियंत्रित ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्याने १४ जणांचा मृत्यू! मृतांमध्ये भारतीयांचा समावेश
UAE मध्ये एका अनियंत्रित ट्रकने एकापाठोपाठ अनेक वाहनांना धडक दिली. यात चौदा जणांचा मृत्यू झाला आणि अंदाजे ३० जण जखमी झाले. मृतांमध्ये भारतीयांचा देखील समावेश आहे.
माहितीनुसार एका ट्रकने रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिली. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, १४ जणांचा मृत्यू झाला आणि अंदाजे ३० जण जखमी झाले. ही घटना फुजैराह अमिरातीच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. मृतांमध्ये अनेक भारतीयांचा समावेश असल्याचेही वृत्त आहे. गृह मंत्रालयाच्या निवेदनानुसार, ट्रक चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावले, ज्यामुळे ट्रक दुसऱ्या वाहनाला धडकला. त्यानंतर ट्रक उलटला आणि वाहतूक कोंडीमुळे थांबलेल्या इतर अनेक वाहनांना धडकला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. असेही वृत्त आहे की, धडकेमुळे ट्रकला आग लागली आणि ही आग इतर अनेक वाहनांमध्ये पसरली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले. पोलीस, रुग्णवाहिका आणि नागरी संरक्षण पथकांसह आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अर्ध्या जखमींना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर उर्वरितांवर अजूनही उपचार सुरू आहे. मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचण्या करण्यात आल्या आहेत. दुबईतील भारतीय दूतावासाने कळवले आहे की, मृतांमध्ये अनेक भारतीय नागरिक होते.

