1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. TV actor Anuj Thakur dies at 33 in sleep

पहाटे अलार्म वाजत राहिला, आई उठवायला गेली तर.. ३३ वर्षीय अभिनेता अनुज ठाकुरचे निधन

प्रसिद्ध टीव्ही अभिनेते अनुज ठाकूर यांचे अचानक निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते रात्रभर झोपले आणि दिवसाचा प्रकाशही पाहू शकले नाहीत. झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
 
घरी झोपेत असताना अनुज ठाकूर यांचे निधन
मुंबईतील ओशिवारा येथील त्यांच्या घरी झोपेत असताना अनुज ठाकूर यांचे निधन झाले. मंगळवारी (२७ ऑक्टोबर) झोपेत असताना झटके आल्याने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. अभिनेत्याचे जवळचे मित्र आणि कास्टिंग डायरेक्टर रुपेश सोनार यांनी इंडिया टुडे/आज तकला दिलेल्या विशेष मुलाखतीत या वृत्ताला दुजोरा दिला. रुपेश सोनार यांनी सांगितले की, अनुजच्या अचानक झालेल्या निधनाने त्यांचे कुटुंब खूप दुःखी आहे आणि या कठीण काळात त्यांनी गोपनीयतेची विनंती केली आहे.
 
रुपेश सोनार म्हणाले, "अनुज काही काळापासून इंडस्ट्रीपासून दूर होता, पण आम्ही सतत संपर्कात होतो. त्याच्या निधनाच्या सुमारे १० दिवस आधी मी त्याला शेवटचे भेटलो होतो. शुक्रवारी मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी फोन उचलून मला त्याच्या निधनाची बातमी दिली."
 
अनुजला वर्षभरापूर्वीही फिट आली होती
"जेव्हा मी त्याच्या कुटुंबीयांना भेटलो, तेव्हा त्यांनी सांगितले की झोपेत आलेल्या फिटमुळे त्याचा मृत्यू झाला असावा. सकाळी त्याचा अलार्म वाजला आणि जेव्हा त्याची आई त्याला बघायला गेली, तेव्हा अनुजचे निधन झाले होते."
 
रुपेश पुढे म्हणाले, "या वर्षाच्या सुरुवातीलाही अनुजला फिट आली होती, ज्यासाठी तो औषधोपचार घेत होता. यावेळी, कदाचित तो एकटा असल्यामुळे, त्याला वाचवता आले नाही."
पुढील लेख
हॅलोविनमध्ये जान्हवी कपूरने ओरीसोबत 'नगीना'मधील आयकॉनिक लूक पुन्हा साकारला; आई श्रीदेवी यांना भावनिक श्रद्धांजली वाहिली