आसाममध्ये विनाशकारी पुरामुळे लाखो कुटुंबे बेघर; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सलमान खान पुढे आला!
आसाममधील परिस्थिती सध्या बिघडत आहे. या विनाशकारी पुरामुळे लाखो कुटुंबे बेघर झाली आहे. बॉलिवूड तारे मदतीसाठी पुढे येत आहे. आधी भूमी पेडणेकर आणि आता सलमान खान, पूरग्रस्तांना मदत करू इच्छितात.
गेल्या १० दिवसांपासून आसाम राज्य भीषण विध्वंस आणि विनाशाचा सामना करत आहे. गेल्या काही वर्षांतील सर्वात भीषण पुराचा सामना करणाऱ्या आसामच्या पूरग्रस्तांसाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे. परिस्थिती आणखी बिकट होत आहे. हजारो लोक बेघर झाले असून मदत शिबिरांमध्ये राहत आहे. या परिस्थितीत, हिंदी चित्रपटसृष्टी आणि बॉलीवूडमधील कलाकार मदतीसाठी पुढे आले आहे. चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनी या कठीण काळात बाधित झालेल्यांना मदत साहित्य पुरवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे.
सुपरस्टार सलमान खानने त्याची एनजीओ 'बीइंग ह्युमन' आणि त्याचा अधिकृत फॅन क्लब (एसकेएफसी आसाम) यांच्या सहकार्याने मदतकार्य सुरू केले आहे. वृत्तानुसार हे मदतकार्य तीन टप्प्यांमध्ये विभागले गेले आहे.
तसेच अभिनेत्री भूमी पेडणेकर 'इंडिया डिझास्टर रिलीफ फाउंडेशन' (BDRF) सोबत सामील झाली आहे. ती, BDRF च्या टीमसोबत, शिवसागरमधील पूरग्रस्त कुटुंबांना शिधावाटप किट, स्वच्छता किट आणि स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवत आहे.
Edited By- Dhanashri Naik
