Marathi Employment News

Notifications

  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी



आज नागपंचमी; नैवेद्यासाठी बनवा 'ही' पारंपरिक गोड रेसिपी

आज नागपंचमी; नैवेद्यासाठी बनवा 'ही' पारंपरिक गोड रेसिपीदिंड बनवण्याची कृती १. प्रथम सारण तयार करा: कढईत थोडे तूप गरम करून त्यात खसखस घाला. खसखस हलकी भाजल्यानंतर त्यात किसलेले खोबरे आणि गूळ घाला. हे मिश्रण मंद आचेवर शिजवा. गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर मिश्रण थोडे घट्ट होऊ द्या. त्यात वेलची आणि जायफळ पूड घालून व्यवस्थित मिसळा. गॅस बंद करून सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. २. पीठ मळून घ्या: एका परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यात तूप आणि चिमूटभर मीठ घालून मिक्स करा. आवश्यकतेनुसार पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या. पीठ काही मिनिटे झाकून ठेवा. ३. दिंड तयार करा: पीठाचे छोटे गोळे करून त्याची पातळ पोळी लाटून घ्या. त्यामध्ये तयार केलेले खोबरे-गुळाचे सारण भरा आणि पोळी बंद करून हलक्या हाताने दाबा. ४. तव्यावर भाजा: गरम तव्यावर दिंड ठेवून दोन्ही बाजूंनी मंद ते मध्यम आचेवर भाजा. वरून थोडे तूप सोडल्यास दिंड अधिक खमंग आणि स्वादिष्ट होतो.