नागपूरमध्ये मोठा अपघात; बांधकाम स्थळावर क्रेन कोसळल्याने दोन कामगारांचा मृत्यू तर २ जखमी
नागपूरच्या गणेशपेठ येथील म्हाडाच्या बांधकाम स्थळावर क्रेन उतरवताना झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील म्हाडाच्या बांधकाम स्थळावर क्रेन कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आणि दोघे जखमी झाले. मृतकांची ओळख भंडारा जिल्ह्यातील रहिवासी विश्वनाथ कथाणे आणि उत्तर प्रदेशातील रहिवासी मुकेश निषाद अशी पटली आहे. इतर दोन जखमी कामगार झारखंडचे असून त्यांच्यावर ओरियन रुग्णालयात उपचार सुरू आहे.
माहितीनुसार, गणेश पेठ इकाके येथे म्हाडातर्फे बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या बांधकाम स्थळावर एक क्रेन ऑपरेटर आणि तीन कामगार काम करत होते. सकाळी १०:३० वाजता क्रेन काढली जात असताना ती अचानक कोसळली, त्यात ऑपरेटर आणि त्याच्या एका सहकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताचा तपशील देताना पोलीस उपआयुक्त म्हणाले की, हा अपघात सकाळी १०:३० वाजता झाला. यात दोघांचा मृत्यू झाला आणि इतर दोघे जखमी झाले. ही घटना तांत्रिक बिघाडामुळे घडली की मानवी चुकीमुळे, याचा तपास नागपूर पोलीस करणार आहे. आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन केले गेले होते की नाही, याचाही तपास केला जात असल्याचे डीसी यांनी सांगितले.#WATCH | Nagpur, Maharashtra: Two killed, two injured after a crane collapses at an under-construction MHADA building site. (Visuals from the spot) https://t.co/az1mBFLwrK
— ANI (@ANI) October 30, 2026

