1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Terrible accident on Akola Balapur highway

शेगावहून पातूरला परतणाऱ्या भाविकांचा अकोला-बाळापूर महामार्गावर अपघात; १ ठार तर २ जखमी

शेगावहून पातूरला परतणाऱ्या भाविकांची रिधोरा उड्डाणपुलाजवळ डिव्हायडरला धडक बसली. यात एकाच मृत्यू झाला आणि इतर दोघे जखमी झाले.
शेगावमधील श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन पातूरला परतणाऱ्या भाविकांचा अकोला-बाळापूर महामार्गावरील रिधोरा उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात झाला. अकोला-बाळापूर महामार्गावरील रिधोरा उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कार चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या डिव्हायडरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधून प्रवास करणाऱ्या पातूरच्या रहिवासी चेतना परदे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात शरयू परदे आणि अमोल राखोंडे जखमी झाले. दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे.  
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
दिल्ली उच्च न्यायालयाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्याने घबराट, तपास सुरु