आजपासून नगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम
महाराष्ट्र राज्यात आजपासून नगरपालिका निवडणूक प्रचार सुरु होणार असून २४६ नगरपालिका तर ४२ नगर पंचायती करिता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. तसेच राज्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून १७ नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
महाराष्ट्र राज्यात निवडणूक प्रचार आज पासून सुरु झाला आहे.तसेच या निवडणुकांसोबतच राज्यात राजकरण चांगले तापत आहे. तर सत्ताधारी महायुती म्हणजेच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. तर विरोधी पक्ष महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना युबीटी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी आजून कोणतेही निर्णय घेतलेले असून त्यामुळे राज्यता नवीन राजकीय समीकरणे उदयास येऊ शकतात.
तसेच महाराष्ट्र राज्यात मतदान हे २ डिसेंबरला २०२५ होणार असून मतमोजणी ही ३ डिसेंबर २०२५ ला होणार आहे
Edited By- Dhanashri Naik