1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. many tourist places closed in Lonavala

लोणावळ्यातील पर्यटन स्थळांवर बीएनएसएसचे कलम १६३ लागू; पवना धरण आणि टायगर पॉइंट ३१ जुलैपर्यंत बंद

लोणावळ्यात मुसळधार पाऊस आणि अपघाताचा धोका लक्षात घेता, प्रशासनाने ३१ जुलैपर्यंत कलम १६३ लागू केले आहे. पवना धरण आणि टायगर पॉइंटसह अनेक पर्यटन स्थळे बंद राहतील. अशी माहिती समोर आली आहे.

लोणावळा आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून कलम १६३ लागू केले आहे. हा आदेश लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रमुख पर्यटन स्थळांवर ६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते ३१ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहील. संभाव्य अपघात टाळण्यासाठी, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
या निर्बंधात्मक आदेशात लोणावळा परिसरातील अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळांचा समावेश आहे. यामध्ये एकवीरा देवी मंदिर, कार्ले लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, टिकोना किल्ला, तुंग किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट आणि पवना धरण यांचा समावेश आहे. मुसळधार पावसात या ठिकाणी सुरक्षा आणि निगराणी वाढवली जाईल. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जलाशय आणि धबधब्यांची पाणी पातळी अचानक वाढली आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जाण्याच्या आणि बुडण्याच्या घटना घडल्या आहे.
या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षकांनी पर्यटन मार्ग आणि संवेदनशील ठिकाणांची पाहणी केली असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे निर्देश दिले आहे. 
Edited By- Dhanashri Naik