लंडनमध्ये 'जय महाराष्ट्र'चा जयघोष! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित
लंडनमध्ये एकनाथ शिंदे यांना तीन प्रमुख आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. हा सन्मान स्वीकारण्यासोबतच, त्यांनी ब्रिटिश संसदेत राज्याच्या उपक्रमांवरही प्रकाश टाकला.
दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोककल्याणकारी कार्याचा आणि नेतृत्वाचा तीन प्रमुख आणि प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. या जागतिक सन्मानामुळे केवळ शिवसैनिकांमध्येच नव्हे, तर जगभरातील मराठी समाजातही प्रचंड उत्साह आणि अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरल्यावर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्थानिक मराठी समाजाने अभूतपूर्व आणि भव्य स्वागत केले. पारंपरिक वेशभूषेत, मराठी बंधू-भगिनींनी ढोल-ताशांच्या गजरात 'जय भवानी, जय शिवाजी' घोषणांचा जल्लोष केला.???? युनायटेड किंग्डम |
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 9, 2026
'यूके एशियन बिझनेस कौन्सिल' आणि 'कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस' यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह 'हाऊस ऑफ लॉर्डस'मध्ये आज कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने मला गौरवण्यात आले.
यावेळी या… pic.twitter.com/C8XCWhcZwO
कोणत्या तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले?उपमुख्यमंत्री म्हणून आजवर राबवलेल्या नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धतीसाठी हा बहुमान असून, विशेषत: माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठीची सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना', नागरिकांना शासकीय सेवा थेट… pic.twitter.com/58H77djhWi
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 9, 2026
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पारदर्शक शासन आणि नागरिक-केंद्रित धोरणांसाठी लंडनमध्ये आयोजित विविध आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले.
कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रेकग्निशन अवॉर्ड: त्यांना ब्रिटिश संसदेच्या प्रतिष्ठित 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रेकग्निशन अवॉर्ड' प्रदान करण्यात आला.
स्टेट्समनशिप अवॉर्ड: ब्रिटिश संसदेच्या 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये आयोजित 'इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६' दरम्यान त्यांना 'स्टेट्समनशिप अवॉर्ड' प्रदान करण्यात आला.
ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड: राज्याला जागतिक स्तरावर गौरव मिळवून दिल्याबद्दल स्थानिक महाराष्ट्र मंडळातर्फे त्यांना 'ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले.
ब्रिटिश संसदेत जय महाराष्ट्राचा जयघोष
ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये पुरस्कार स्वीकारताना एकनाथ शिंदे यांनी 'जय महाराष्ट्र'ची घोषणा केली. त्यांनी हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स या दोन्ही सभागृहांमध्ये आपले विचार व्यक्त केले. यावेळी, त्यांनी महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा राज्य सरकारचा दूरदर्शी आराखडा आणि दूरदृष्टी जागतिक स्तरावर सादर केली.
लंडनमध्ये महाराष्ट्राच्या तीन प्रमुख योजना चमकल्या
मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील पारदर्शक आणि लोककेंद्रित दृष्टिकोन हे या आंतरराष्ट्रीय सन्मानाचे कारण असल्याचे सांगितले गेले. विशेषतः, त्यांच्या तीन लोककल्याणकारी योजनांची लंडनमध्ये खूप प्रशंसा झाली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेचा जागतिक स्तरावर विशेष उल्लेख झाला.
शासन आपल्या दारी: सरकारी योजनांचे लाभ आणि कागदपत्रे थेट सामान्य नागरिकांच्या घरी पोहोचवण्याच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक झाले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना: युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या या योजनेला आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रशंसा मिळाली आहे.
एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय मान्यतेमुळे, महाराष्ट्राच्या लोककल्याणकारी कार्यक्रमांना आता ब्रिटनसारख्या देशांमध्येही मान्यता मिळाली आहे.
Edited By- Dhanashri Naik
