1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. MPSC aspirant from Pune commits suicide by hanging

कर्जामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांची गळफास घेत आत्महत्या

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्यासाठी पुण्यात आलेल्या धाराशिवातील २५ वर्षीय तरुणाने राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रथमेश दिलीप देशमुख असे या मयत तरुणाचे नाव आहे. तरुणावर अडीच लाखांचे कर्ज झाल्यामुळे आर्थिक ताणामुळे त्याने असे टोकाचे पाऊल घेतले असल्याच्या पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. त्याच्या मृतदेहा जवळ एक सुसाईड नोट सापडली असून त्यात त्याने आर्थिक व्यवहारांचा उल्लेख केला आहे. 
 सदर घटना नारायण पेठात घडली असून प्रथमेश हा तरुण गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पुण्याच्या नारायण पेठ इथे एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी धाराशिव येथून आला होता. काही काळापासून त्याला आर्थिक ताण होता. त्याने एकाकडून पैसे उसने घेतले असून त्याला पुण्यात राहणे आणि कर्जाची परतफेड करणे कठीण होत होते. त्याच्या खोलीचे भाडे देखील थकले होते. तो घरी परत जाण्याचा विचार करत होता. 
त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली त्यात त्याने अर्थी चणचण , उसने घेतलेले पैसे  असे नमूद केले होते.. प्रथमेशवर नेमके किती कर्ज होते, त्याने कोणाकडून पैसे घेतले होते आणि आत्महत्येमागे अन्य कोणते कारण आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत. सुसाईड नोटमधील उल्लेखांच्या आधारे संबंधित व्यक्तींचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. 
Edited By - Priya Dixit 
पुढील लेख
LIVE: मराठवाड्यात ३.१६ लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप