गुगलची आय फोनला टक्कर पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL बाजारात
गुगलने पुन्हा आय फोनला जोरदार टक्कर दिली असून. यावेळी पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL बाजारात दाखल केले आहेत. यामध्ये गुगलने एचटीसीसोबत दोन्ही स्मार्टफोन तयार केला असून जर आपण फीचर्स पाहिले तर फोन अॅपलच्या आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसला टक्कर देणार आहेत. यामध्ये आपल्या देशात पिक्सेल 2 ची किंमत 61 हजार रुपयांपासून तर फोनच्या 128GB व्हेरिएंटची किमत 70 हजार रुपये असणार आहे. तर पिक्सेल 2 XL ची किंमत 73 हजार असून 128GB व्हेरिएंटची किंमत 83 हजार रुपये असणार आहे.
या मोबाईलची काही फीचर्स
- 5 इंच आकाराची स्क्रीन
- पिक्सेल 2 XL मध्ये 6 इंच आकाराची स्क्रीन
- 64GB आणि 128GB व्हेरिएंटमध्ये हे फोन
- स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर आणि 4GB रॅम
- वॉटरप्रूफ डिझाईनसह IP 67 सर्टिफाईड
- ड्युअल सेन्सर टेक्निक
- 12.2 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा
- सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा
- ई-सिम सपोर्ट
- अँड्रॉईडची लेटेस्ट ओरियो 8.0
- स्टेरियो स्पीकर
