1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Bihar Lovers beaten up by villagers three arrested

Bihar : प्रेमी युगुलाला गावकऱ्यांकडून बेदम मारहाण, तिघांना अटक

arrest
Bihar :बिहारच्या गया जिल्ह्यात सलैया गावात एका प्रेमी जोडप्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या जोडप्याचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. ते दोघे गावात लपूनछपून भेटायचे त्यांनी लग्न करण्याचा विचार केला आणि गावातल्या बलियारी देवीच्या मंदिरात लग्न करण्याच्या निर्णय घेतला.ही बातमी गावकऱ्यांना समजल्यावर गावकरी संतापले आणि त्यांनी दोघांना मंदिरात पकडले आणि त्यांच्या सोबत गैरवर्तन केले. 
 
त्यांना मारहाण केली आणि त्यांचे केस कापून त्यांचे कपडे काढून त्यांना गावातून बाहेर हाकलले.  तर मुलीला देखील मारहाण केली आणि पुन्हा गावात न येण्याची धमकी दिली. मुलीच्या वडिलांना देखील गावातून बाहेर काढण्यात आले. 
 
या घटनांनंतर या प्रेमी युगुलांनी या प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये गावकर्यांबद्दल तक्रार केली आहे. आणि सुरक्षेची मागणी केली आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.  
 
Edited by - Priya Dixit 
 
पुढील लेख
IND vs JAP Hockey: भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियाडमध्ये सुवर्णपदक जिंकले, पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र