1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. Student dies after tree falls on school bus in Chembur

मुंबईत चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबईतील चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर पिंपळाचे झाड कोसळल्याने ११ वर्षीय विद्यार्थी विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला आणि १० जण जखमी झाले. बीएमसीच्या निष्काळजीपणामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी चेंबूर परिसरात एका भीषण अपघातात, एक मोठे पिंपळाचे झाड स्कूल बसवर कोसळल्याने ११ वर्षीय विद्यार्थी विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला आणि १० जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी दुपारी २:५८ च्या सुमारास चेंबूरमधील रोड क्रमांक ११ वरील हेरिटेज प्राईड इमारतीसमोर घडला. त्यावेळी युनिव्हर्सल हायस्कूलच्या बसमध्ये १३ विद्यार्थी होते. रस्त्याच्या कडेला उभे असलेले एक मोठे पिंपळाचे झाड अचानक उन्मळून थेट बसवर कोसळले. झाड पडताच बस चालक, वाहक आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ प्रतिसाद देत मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याचा दुपारी ४:२३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर चार जखमींपैकी एका विद्यार्थिनीला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर एक विद्यार्थी गंभीर जखमी अवस्थेत सध्या आयसीयूमध्ये आहे. अशी माहिती समोर आली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, महापौर रितू तावडे यांनी संबंधित झाडाबाबत स्थानिक नागरिकांनी यापूर्वी काही तक्रारी दाखल केल्या होत्या का, याची सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. जर अधिकाऱ्यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष केले असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले जाईल आणि कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल.
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा