1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 26 जुलै 2025 (16:13 IST)

नवी मुंबईतील केमिकल फॅक्टरीत भीषण आग

Maharashtra News
महाराष्ट्रातील नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी परिसरात सकाळी एका केमिकल फॅक्टरीत भीषण आग लागली. तसेच घटनेनंतर लगेचच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी परिसरात असलेल्या एका केमिकल कंपनीत शनिवारी पहाटे आग लागली. ही घटना पहाटे ३:०० वाजता घडली.
अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अधिकाऱ्यांनी अद्याप आगीचे कारण निश्चित केलेले नाही आणि पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती समोर आली आहे. 
Edited By- Dhanashri Naik