1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. Hashish worth Rs 12 20 crore seized from Lokmanya Tilak Terminus

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे १२.२० कोटी रुपये किमतीचा चरस जप्त

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी शाखेने लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.२० कोटी रुपये किमतीचा १२.२० किलोग्रॅम चरस जप्त केला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी अंमली पदार्थ विरोधी शाखेच्या वरळी युनिटच्या पथकाला दोन व्यक्ती संशयास्पद फिरताना दिसल्या आणि त्यांनी त्यांना तपासणीसाठी थांबवले. "त्यांच्या ताब्यातून १२.२० कोटी रुपये किमतीचा १२.२० किलोग्रॅम चरस जप्त काण्यात आला. चौकशीदरम्यान, त्यांनी उत्तर प्रदेशातील त्यांच्या पुरवठा साखळीबद्दल माहिती दिली, त्यानंतर एक पथक त्या राज्याकडे रवाना झाले,"
अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील लेख
सांताक्रूझ आणि माहीम दरम्यान २८/२९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर ४ तासांचा ब्लॉक