1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
  4. stuffed capsicum

मक्याचे दाणे आणि सिमला मिरची

साहित्य- 2 वाट्या मक्याचे दाणे, 1/2 चमचा जिरे पूड, पाव चमचा ओवा, 1 चमचा लसूण हिरवी मिरची पेस्ट, 2 लहान चमचे दही, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, तिखट, मीठ, हळद, हिंग, 5-6 लहान आकारातील सिमला मिर्च. 
 
कृती : सर्वप्रथम मिरची भरलेल्या वांग्याप्रमाणे मधोमध कापून घ्या. बिया काढून घ्या. एका भांड्यात मक्याचे दाणे व मसाल्याचे सर्व साहित्य एकत्र करून तेलाचे मोहन घाला. मिरचीच्या बिया त्यातच घाला थोडे दही घालून मिश्रण ओलसर करून घ्या. कढईत तेल, जिरे व मोहरी व हिंग घालून फोडणी करा व तेलावर मिरच्या पसरून लावा. मंद आचेवर मिरच्या लालसर होऊ द्या. बाजू उलटून घ्या. सर्व बाजूंनी मिरची लाल झाल्यावर गॅस बंद करा. झटपट भरवा सिमला मिरची तयार होईल.
पुढील लेख
पर्वतासन करा आणि खांदेदुखीपासून बचाव करा