Datta Jayanti 2025 श्री दत्तात्रेयांना प्रिय असलेले आणि नैवेद्य म्हणून खास तयार केले जाणारे पदार्थ
श्री दत्तात्रेयांना काही विशिष्ट पदार्थ अत्यंत प्रिय होते, जे दरवर्षी दत्त जयंतीला नैवेद्यात आवर्जून केले जातात.
घेवड्याची भाजी
हा पदार्थ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय होता असे मानले जाते. त्यामुळे दत्त जयंतीच्या नैवेद्यात ही भाजी केली जाते. तसेच यात चिंच आणि गूळ घालून त्याची चव आंबट-गोड केली जाते.
गव्हाच्या पिठाचा शिरा
हा शिरा गव्हाचे पीठ, गूळ आणि भरपूर तूप वापरून केला जातो. याला 'अमृत पाक' किंवा 'कणीक शिरा' असेही म्हणतात. गव्हाचे पीठ चांगले भाजून, गुळाच्या गरम पाण्यात शिजवून हा पदार्थ तयार होतो.
सुंठवडा (आले-वेलची पावडर)
हा पदार्थ प्रसाद दत्त जयंतीला विशेष महत्त्वाचा आहे. यात सुंठ (वाळलेले आले), गुळ, धणे आणि वेलची यांचा वापर केला जातो. हा पदार्थ पूजा झाल्यावर प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो.
केशरी भात
गूळ किंवा साखर वापरून, केशराचा रंग आणि वेलची घालून केलेला गोड भात तयार केला जातो. व दत्त जयंतीला नैवेद्यात ठेवला जातो.
पुरणपोळी
काही ठिकाणी दत्त जयंतीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे, कारण हा एक शुभ आणि महत्त्वाचा पारंपरिक पदार्थ मानला जातो.
वांगी भरीत
श्री दत्तात्रेयांना वांगी अतिशय प्रिय मानले जाते. भाजलेले मोठे वांगे घेऊन त्यात शेंगदाण्याची पूड, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, लिंबाचा रस घालून नैवेद्यात ठेऊ शकतात.
पेढे किंवा बेसन लाडू
दत्तात्रेयांना गोड पदार्थ अतिशय प्रिय. घरचे बेसनाचे लाडू किंवा मलई पेढे उत्तम नैबेड्यासाठी ऊत्तम आहे.
श्री दत्त जयंतीला या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा
*नैवेद्य बनवताना कांदा, लसूणयांसारख्या पदार्थांचा वापर पूर्णपणे टाळला जातो.
*दत्त जयंतीला प्रसाद म्हणून साध्या, सात्विक बनवलेल्या पदार्थांची परंपरा आहे. या दिवशी विशेषतः भगवान दत्तात्रेयांना आवडणारे नैवेद्य दाखवले जातात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik