संबंधित माहिती
- Karwa Chauth 2025 : करवा चौथ कधी? ९ ऑक्टोबर की १० ऑक्टोबर? संपूर्ण पूजा विधी आणि शुभ वेळ जाणून घ्या
- Strawberry Flavor Basundi : स्ट्रॉबेरी फ्लेवर बासुंदी मुलांसाठी कोजागिरी स्पेशल डिश
- कोजागरी पौर्णिमेला पारंपरिक बासुंदीला द्या चॉकलेट ट्विस्ट; मुलांची फेव्हरेट डिश
- विश्वकर्मा पूजा विशेष नैवेद्यात बनवा खास पाककृती Flavored Coconut Laddu
- श्राद्ध पक्षात बनवा तांदळाची खीर रेसिपी
Karwa Chauth 2025 Special मावा बर्फी पाककृती
शुक्रवारी करवा चौथ साजरे केले जाणार आहे. या खास सणाच्या दिवशी तुम्ही नक्कीच नैवेद्यात गोड पदार्थ बनवू शकता. बनायला सोपी आणि चवीला स्वादिष्ट अशी मावा बर्फी ही एक पारंपरिक भारतीय मिठाई आहे जी या दिवशी नक्कीच बनवू शकतात.
साहित्य-
मावा- २५० ग्रॅम
साखर- १५० ग्रॅम
दूध - तीन चमचे
तूप- दोन चमचे
वेलची पूड- अर्धा चमचा
काजू
बादाम
पिस्ता
केशर-दूधात भिजवलेले
सर्वात आधी माव्याला मध्यम आचेवर नॉन-स्टिक पॅनमध्ये तूप टाकून हलके भाजून घ्या. यामुळे माव्याचा कच्चा वास निघून जाईल. सतत हलवत रहा जेणेकरून मावा जळणार नाही. भाजलेल्या माव्यात साखर घाला. साखर मिसळल्यानंतर मिश्रण पातळ होईल. मध्यम आचेवर सतत हलवत रहा.
जर मिश्रण खूप कोरडे वाटले, तर तीन चमचे दूध घाला. आता वेलची पूड आणि भिजवलेले केशर घाला. मिश्रण चांगले मिसळा. मिश्रण जेव्हा घट्ट होऊन पॅनच्या बाजूंना सोडू लागेल, तेव्हा गॅस बंद करा.
एका तूप लावलेल्या ट्रे मध्ये मिश्रण पसरवा. त्यावर हलके दाब देऊन सपाट करा. वरून बारीक चिरलेले काजू, बादाम किंवा पिस्ता गार्निश करा. मिश्रण थंड झाल्यावर चाकूने इच्छित आकारात वड्या कापून घ्या. तर चला तयार आहे आपली मावा बर्फी रेसिपी. ही मावा बर्फी सर्वांना आवडेल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
साहित्य-
मावा- २५० ग्रॅम
साखर- १५० ग्रॅम
दूध - तीन चमचे
तूप- दोन चमचे
वेलची पूड- अर्धा चमचा
काजू
बादाम
पिस्ता
केशर-दूधात भिजवलेले
ALSO READ: शेंगदाण्याची बर्फी रेसिपी
कृती-सर्वात आधी माव्याला मध्यम आचेवर नॉन-स्टिक पॅनमध्ये तूप टाकून हलके भाजून घ्या. यामुळे माव्याचा कच्चा वास निघून जाईल. सतत हलवत रहा जेणेकरून मावा जळणार नाही. भाजलेल्या माव्यात साखर घाला. साखर मिसळल्यानंतर मिश्रण पातळ होईल. मध्यम आचेवर सतत हलवत रहा.
जर मिश्रण खूप कोरडे वाटले, तर तीन चमचे दूध घाला. आता वेलची पूड आणि भिजवलेले केशर घाला. मिश्रण चांगले मिसळा. मिश्रण जेव्हा घट्ट होऊन पॅनच्या बाजूंना सोडू लागेल, तेव्हा गॅस बंद करा.
एका तूप लावलेल्या ट्रे मध्ये मिश्रण पसरवा. त्यावर हलके दाब देऊन सपाट करा. वरून बारीक चिरलेले काजू, बादाम किंवा पिस्ता गार्निश करा. मिश्रण थंड झाल्यावर चाकूने इच्छित आकारात वड्या कापून घ्या. तर चला तयार आहे आपली मावा बर्फी रेसिपी. ही मावा बर्फी सर्वांना आवडेल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Fasting Barfi उपवासाची पनीर बर्फी रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: पिस्ता बर्फी रेसिपी