संबंधित माहिती
- पावसाळ्यात बाईक चालवणाऱ्यांनी या 6 गोष्टी नेहमी सोबत ठेवा
- घरात ओल आणि कपड्यांना कुबट वास येतोय? 'हे' घरगुती उपाय करून बघाच
- Pregnancy Cravings गरोदरपणात डोहळे का लागतात? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारणे !
- तुम्ही पावसाळ्यात सहलीला जात असाल तर या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या
- छत्री खरेदी करण्यापूर्वी 'या' ५ गोष्टी नक्की तपासा; नाहीतर पावसात होईल पश्चात्ताप
पावसाळ्यात माशांचा त्रास वाढलाय? घरातून कायमचे दूर ठेवतील 'हे' 7 सोपे उपाय
पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात घरात माशांचा त्रास वाढतो. ज्यामुळे घाण आणि आजारांचा धोका वाढतो. माशांपासून सुटका कशी मिळवायची या साठी हे उपाय कामी येतील. चला जाणून घेऊ या.
पावसाळ्याच्या आगमनाबरोबरच माश्या घराभोवती घोंघावू लागतात. कधीकधी त्या स्वयंपाकघरातील अन्नावर बसतात, तर कधीकधी जेवणाच्या टेबलाभोवती आणि कचरापेटीभोवतीघिरट्या घालतात. ह्या दिसायला अगदी लहान असलेल्या माश्या केवळ घरातील लोकांना त्रास देत नाहीत, तर खूप घाणही पसरवतात.त्या घरात विविध प्रकारचे जंतूदेखील आणू शकतात. त्यांच्यामुळे त्रस्त झालेले लोक त्यांना दूर ठेवण्यासाठी विविध रासायनिक उत्पादने आणि स्प्रे विकत घेतात. तरीही माश्या घरात परत येतात. काही सोपे उपाय करून करून माश्या दूर ठेवता येतील. चला तर मग जाणून घेऊ या.
कचऱ्याची पेटी दररोज रिकामी करा:
स्वयंपाकघरातील कचरा घरात दिवसभर पडून राहू देऊ नका. विशेषतः उन्हाळ्यात, कचऱ्याची पेटी दररोज रिकामी करा आणि तिचे झाकण बंद ठेवा. घराबाहेरील कचऱ्याची पेटी दारापासून थोड्या अंतरावर ठेवा.
स्वयंपाकघरातील कचरा घरात दिवसभर पडून राहू देऊ नका. विशेषतः उन्हाळ्यात, कचऱ्याची पेटी दररोज रिकामी करा आणि तिचे झाकण बंद ठेवा. घराबाहेरील कचऱ्याची पेटी दारापासून थोड्या अंतरावर ठेवा.
सडलेली फळे आणि उरलेले अन्न ताबडतोब काढून टाका:
केळ्याची साले, कापलेली फळे, उरलेले अन्न किंवा खराब झालेल्या भाज्या इकडे तिकडे पडून ठेवू नका. या गोष्टी माश्यांना सर्वात जास्त आकर्षित करतात.
कापूर
माशांना कापराचा तीव्र सुगंध अजिबात सहन होत नाही.
कसे वापरावे: घरात कापूर जाळून त्याचा धूर पूर्ण खोलीत पसरू द्या. किंवा कापराच्या वड्या पाण्यात टाकून ते पाणी घरात शिंपडा. यामुळे माशा लगेच पळून जातात.
गटारे नियमितपणे स्वच्छ करा: साचलेल्या घाणीमुळे सिंक किंवा गटारांमध्ये माश्यांची पैदास होऊ शकते. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ब्रश आणि ड्रेन क्लिनर वापरून ती पूर्णपणे स्वच्छ करा.
लवंग आणि लिंबू
हा उपाय माशांना पळवून लावण्यासाठी अतिशय प्रभावी आणि सुगंधी आहे.
कसे वापरावे: एका लिंबाचे दोन तुकडे करा आणि त्यात ७-८ लवंगा खोचा. हे लिंबाचे तुकडे डायनिंग टेबल किंवा किचनमध्ये ठेवा. लवंग आणि लिंबाच्या एकत्रित वासामुळे माश्या दूर राहतात..
बाहेर जेवताना अन्न झाका: जर तुम्ही तुमच्या बाल्कनी, गच्ची किंवा बागेत जेवत असाल, तर तुमचे अन्न जाळीच्या झाकणाने झाका. यामुळे अन्नावर माश्या बसणार नाही.
पाळीव प्राण्यांची विष्ठा ताबडतोब स्वच्छ करा: तुमच्या घरात कुत्रा किंवा मांजर असल्यास, त्यांच्या विष्ठेकडे दुर्लक्ष करू नका. यामुळे माश्यादेखील आकर्षित होतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit
