Chicken Ghee Roast झणझणीत व चविष्ट डिश ''चिकन घी रोस्ट''
दक्षिण भारतीय शैलीतील तूप आणि बेडगी मिरचीचा वापर करून बनवलेली ही झणझणीत व चविष्ट डिश सर्वत्र लोकप्रिय आहे.
साहित्य- ५०० ग्रॅम चिकन, ४-५ चमचे साजूक तूप, १०-१२ भिजवलेल्या बेडगी लाल मिरच्या, १ चमचा धणे, १/२ चमचा जिरे, ५-६ काळी मिरी, लसूण, छोटा चिंचेचा तुकडा, गूळ (चिमूटभर), कढीपत्ता आणि दही.
कृती-चिकनला दही, हळद आणि मीठ लावून ३० मिनिटे ठेवा. भिजवलेल्या मिरच्या, धणे, जिरे, मिरी, लसूण आणि चिंच एकत्र वाटून बारीक पेस्ट तयार करा. कढईत साजूक तूप गरम करून त्यात कढीपत्ता आणि वाटलेला मसाला टाकून तूप सुटेपर्यंत चांगले परता. त्यात मॅरीनेट केलेले चिकन व चिमूटभर गूळ घालून मसाला चिकनला पूर्णपणे चिकटून सुका होईपर्यंत शिजवा.

ALSO READ: How to make Butter chicken बटर चिकन रेसिपी
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.