ईस्ट झोनने दलीप ट्रॉफी २०२६ जिंकली; इशान किशनने १३ वर्षाची प्रतीक्षा संपवली
ईस्ट झोनने दलीप ट्रॉफी २०२६ जिंकली आहे. साऊथ झोनविरुद्धचा अंतिम सामना अनिर्णित राहिला, परंतु इशान किशनच्या नेतृत्वाखालील ईस्ट झोनला पहिल्या डावाच्या आधारावर विजेता घोषित करण्यात आले.
जवळपास १३ वर्षांपासून ज्याची प्रतीक्षा होती, ते इशान किशनने अखेर साध्य केले. दलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ईस्ट झोनने साऊथ झोनला पराभूत करून विजेतेपद पटकावले. अंतिम सामना अनिर्णित राहिला असला तरी, पहिल्या डावाच्या आधारावर ईस्ट झोनला विजेता घोषित करण्यात आले. या विजयात कर्णधार इशान किशनने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने केवळ बॅटने दमदार खेळीच केली नाही, तर कर्णधार म्हणून महत्त्वाच्या क्षणी योग्य निर्णय घेऊन संघाला विजय मिळवून दिला.
Edited By- Dhanashri Naik

