अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीचे निधन
अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचे निधन झाले. त्या कास्च्युम फॅशन डिझाइनर होत्या. सदर माहिती महेश आणि दीपा यांचा मुलगा सत्या मांजरेकर याने इंस्टावर स्टोरी पोस्ट करत दिली.
महेश व दीपा मेहता यांचा घटस्फोट झाला असून त्यांना दोन अपत्ये सत्या मांजरेकर व अश्वमी मांजरेकर अशी दोन अपत्ये आहेत.
दीपा मेहता यांचे लग्न महेश मांजरेकर यांच्याशी झाले होते. त्या कॉस्च्युम व फॅशन डिझाइनर असून क्वीन ऑफ हार्ट्स साड्यांचा ब्रॅण्ड चालवत होत्या. महेश व दीपा ला अश्वमी आणि सत्या अशी दोन मुले आहेत.
अश्वमी सध्या अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. महेश व दीपाच्या घटस्फोटांनंतर दोन्ही मुले आईसोबत राहत होती.
नंतर महेश मांजरेकर यांनी मेधाशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी सई मांजरेकर आहे. सई देखील अभिनेत्री आहे. सत्या मांजरेकर याने आईच्या निधनाची बातमी जुना फोटो स्टोरी मध्ये शेअर केले आहे.
Edited By - Priya Dixit