1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
  4. Important news for UPI users

UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; या ३ गोष्टी जाणून घ्या

UPI Payments
भारतात डिजिटल पेमेंटसाठी UPI चा वापर प्रचंड वाढला आहे. लहान किराणा दुकानापासून ते मोठ्या मॉलपर्यंत सर्वत्र UPI द्वारे व्यवहार केले जातात. वाढत्या लोकप्रियतेसोबतच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वेळोवेळी युजर्सच्या सुरक्षेसाठी आणि सुविधेसाठी नवीन नियम व मार्गदर्शक तत्त्वे जारी करत असतात.
जर तुम्ही नियमितपणे PhonePe, Google Pay, Paytm किंवा इतर कोणतेही UPI ॲप वापरत असाल, तर खालील ३ गोष्टी जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे:

सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी NPCI आणि RBI च्या नव्या नियमांनुसार काही महत्त्वाचे बदल लागू झाले आहे.
 
१. हाय-व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन्ससाठी बायोमेट्रिक किंवा अतिरिक्त व्हेरिफिकेशन अनिवार्य
फक्त UPI PIN ने आता मोठ्या रकमेचे पेमेंट होणार नाही. फिंगरप्रिंट, फेस ID किंवा अतिरिक्त OTP/डिव्हाइस व्हेरिफिकेशन करावे लागेल. Google Pay, PhonePe, Paytm सारख्या अॅप्सवर हा बदल लागू आहे. यामुळे फसवणूक कमी होईल.
 
२. पेमेंट करण्यापूर्वी रिसीव्हरचे नाव दिसेल (Pre-Transaction Name Verification)
पैसे पाठवताना UPI PIN टाकण्यापूर्वी अॅप तुम्हाला रिसीव्हरचे पूर्ण नाव (बँकेत नोंदलेले) दाखवेल.यामुळे चुकीच्या व्यक्ती/फसव्या QR/लिंकवर पैसे जाण्याची शक्यता कमी होते. नेहमी नाव तपासूनच पेमेंट करा.
 
३. इतर सुरक्षा नियम आणि सावधानता
नवीन वापरकर्त्यांसाठी सुरुवातीला कमी लिमिट (उदा. ₹५,०००) असू शकते. फ्रॉड रोखण्यासाठी दोन-फॅक्टर ऑथेंटिकेशन (२FA) सक्तीचे असून जास्त ट्रान्झॅक्शन्स किंवा संशयास्पद अॅक्टिव्हिटी असल्यास बँक/अॅपकडून अतिरिक्त चेक होऊ शकतो.
 
सल्ला-
तुमच्या अॅपला अपडेट ठेवा.
अनोळखी लिंक/QR स्कॅन करू नका.
नेहमी रिसीव्हरचे नाव तपासा.
फसवणूक झाल्यास ताबडतोब बँक/NPC I हेल्पलाइन वर संपर्क साधा.
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा