1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
  4. Ather cheapest electric scooter on august 29th in india

सर्वात स्वस्त Electric Scooter! २९ ऑगस्टला होणार धमाका! Hero ची Ather मध्ये १,००० कोटींची गुंतवणूक

एथर एनर्जी (Ather Energy) आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. ही ब्रँडची आतापर्यंतची सर्वात स्वस्त स्कूटर असणार आहे. स्कूटरच्या लाँचिंगपूर्वीच हीरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) एथर एनर्जीमध्ये १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या निधीमुळे एथर एनर्जीला आपले नवीन प्रॉडक्ट्स विस्तारण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
 
नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित स्कूटर
गेल्या काही वर्षांपासून एथर एनर्जीचे मुख्य लक्ष प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर्सवर होते. मात्र, आता कंपनीने आपला मार्केट शेअर वाढवण्यावर भर दिला आहे. कंपनी या महिन्याच्या शेवटी आपला नवीन EL (ईएल) प्लॅटफॉर्म सादर करणार असून, २९ ऑगस्ट रोजी या प्लॅटफॉर्मवर आधारित पहिली स्कूटर लाँच करेल.
 
एथरची ही नवीन स्कूटर मुख्यत्वे मास मार्केट ग्राहकांसाठी असेल. हीरो मोटोकॉर्पकडून मिळालेल्या १,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे कंपनीला प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि सॉफ्टवेअर अपडेट्स विकसित करण्यास मदत मिळेल.
 
'रिझ्टा'पेक्षाही कमी असेल किंमत?
एथर एनर्जीच्या विक्रीचा आलेख सध्या सुधारत असून कंपनीला रिझ्टा (Rizta) स्कूटरचा मोठा फायदा झाला आहे. रिझ्टाच्या आक्रमक किमतीमुळे कंपनीला सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे झाले. रिपोर्ट्सनुसार, नवीन ईएल प्लॅटफॉर्मवर आधारित स्कूटर रिझ्टापेक्षाही कमी किमतीत बाजारात आणली जाऊ शकते.
 
नवीन स्कूटर लाँच करण्यापूर्वीच एथरने आपल्या सध्याच्या मॉडेल्समध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने रिझ्टा आणि ४५० सिरीजच्या निवडक व्हेरियंटमध्ये LFP (लिथियम आयर्न फॉस्फेट) बॅटरी सेल्सचा वापर सुरू केला आहे. यामुळे बॅटरीची ड्युराबिलिटी आणि थर्मल स्टेबिलिटी अधिक वाढेल.
 
बॅटरी, रेंज आणि अपेक्षित किंमत
सध्याचे मॉडेल्स: एथर 450S आणि 450X मध्ये २.९ kWh ची बॅटरी मिळते, जी अनुक्रमे १२२ किमी आणि १२६ किमीची रेंज देते. तसेच, ३.५ kWh बॅटरी व्हेरियंटमध्ये १६१ किमीची रेंज मिळते.
 
अपेक्षित किंमत: २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कम्युनिटी डे इव्हेंटमध्ये एथर ही स्कूटर सादर करू शकते. या अपकमिंग स्कूटरची किंमत १ लाख रुपयांच्या आसपास असण्याचा अंदाज असून, ही एथर ब्रँडची आतापर्यंतची सर्वात स्वस्त स्कूटर ठरेल.