संबंधित माहिती
- ऑस्ट्रेलियाचा पहिला रॉकेट उड्डाणानंतर अवघ्या १४ सेकंदात कोसळला
- 8.8 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर रशिया-जपानच्या अनेक भागात त्सुनामी, अलर्ट जारी
- Russian plane crash रशियन विमान अपघात, जळत्या अवस्थेतील अवशेष सापडले, विमानात ५० प्रवासी होते
- अमेरिकेने युनेस्कोमधून बाहेर पडण्याची घोषणा केली, डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलविरुद्ध भेदभावाचा आरोप केला
- बांगलादेशातील शाळेवर हवाई दलाचे F-7 विमान कोसळले, यामध्ये १९ जणांचा मृत्यू तर ५० जखमी
थायलंडमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू
थायलंडमध्ये एक दुःखद दुर्घटना घडली आहे. येथील फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मध्य थायलंडमध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली आहे.
बँकॉकपासून सुमारे ९५ किमी वायव्येस असलेल्या सुफान बुरी प्रांतात हा स्फोट झाला. स्फोटाचे कारण अद्याप कळलेले नाही.
Edited By- Dhanashri Naik
