जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; गस्त घालणाऱ्या सीआरपीएफ जवानांवर गोळीबार
बुधवारी, जम्मू आणि काश्मीरमधील कुलगामच्या नौपोरा अखरान येथे सीआरपीएफच्या ४६ व्या बटालियनच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सुरक्षा दल परिसरात शोधमोहीम राबवत आहे.
सीआरपीएफने एका तपासणी नाक्यावर तैनात असलेल्या जवानांवरील हल्ल्याला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी २:१५ वाजता गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांना लक्ष्य केले. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. कुलगाम क्विक रिॲक्शन टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी जवानांची ओळख हेड कॉन्स्टेबल सोमवीर, कॅडेट संतानो आणि कॅडेट राकेश दास अशी पटली आहे. एका जवानाच्या पायाला, दुसऱ्याच्या हाताला आणि तिसऱ्याच्या पाठीला गोळी लागली आहे.
जखमी जवानांना उपचारासाठी अनंतनाग जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी मोठी शोधमोहीम सुरू आहे. हे विशेष उल्लेखनीय आहे की, जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा सध्या कुलगामच्या दौऱ्यावर आहे.