1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. massive explosion at a steel factory in Turkey

तुर्कस्तानमध्ये एका पोलाद कारखान्यात भीषण स्फोट; १६ जणांचा मृत्यू तर १३ जण जखमी

सोमवारी तुर्कस्तानमध्ये एक भीषण अपघात घडला. इझमीर प्रांतातील एका पोलाद कारखान्यात झालेल्या स्फोटात सोळा जणांचा मृत्यू झाला आणि १३ जण जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी तुर्कस्तानमध्ये एक भीषण घटना घडली. इझमीर प्रांतातील एका पोलाद कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटामुळे लागलेल्या आगीत सोळा जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी या भीषण अपघाताची घोषणा केली आणि सांगितले की १३ जण जखमी झाले आहे.
माहितीनुसार, हा अपघात इझमीर प्रांतातील अलीगा येथील हबास स्टील प्लांटमध्ये घडला. कारखान्यात झालेल्या भीषण स्फोट आणि त्यानंतर लागलेल्या आगीत १६ जणांचा मृत्यू झाला. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी अपघातातील निष्काळजीपणाच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच माहितीनुसार बॉयलर बदलण्याच्या कामादरम्यान एक क्रेन भट्टीमध्ये पडल्याने हा स्फोट झाला.  
पुढील लेख
धारशिवमध्ये घरात लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू