भयंकर! प्रसिद्ध अभिनेत्याचा खून
'टॉप गन मॅव्हरिक' आणि 'जुमानजी' सारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसलेले प्रसिद्ध अभिनेते जेम्स हँडी यांचे निधन झाले आहे. लॉस एंजेलिसच्या तारझाना परिसरात ८१ वर्षीय अभिनेत्याची चाकूने वार करून हत्या करण्यात आली, ज्यामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा गुन्हा त्यांच्या प्रेयसीच्या मुलाने केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, वेस्ट व्हॅली परिसरातील गस्ती पथकाला ३ जून रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास एक फोन आला. फोन करणाऱ्याने एका व्यक्तीची हत्या केल्याचा दावा केला. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा जेम्स हँडी त्यांच्या घराच्या अंगणात छातीवर चाकूच्या खोल जखमांसह गंभीर अवस्थेत पडलेले आढळले. आपत्कालीन वैद्यकीय पथकाने अभिनेत्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, हल्ल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती आणि त्यांना वाचवता आले नाही.
पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे की, खुनी दुसरा कोणी नसून जेम्स हँडीच्या प्रेयसीचा मुलगा मायकल ग्लेडहिल (४४) आहे. आरोपीने स्वतः पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
या बातमीने हॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ उडाली असून, त्यांचे चाहते सोशल मीडियावर सतत श्रद्धांजली वाहत आहे.
Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: तो सीन संपला, पण....अभिनेत्री प्रिया बापटने कठीण काळात सहन कराव्या लागलेल्या अडचणींबद्दल खुलासा केला