शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मराठी निबंध
Written By
Last Updated : शनिवार, 31 जानेवारी 2026 (15:26 IST)

Marathi Essay वृक्षारोपण आणि त्याचे महत्त्व

tree

"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे"  

असे संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी वृक्षांचे महत्त्व सांगताना त्यांना आपले सोयरे मानले होते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण हा केवळ एक कार्यक्रम नसून ती आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे.
 

"झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा!"

आजच्या युगात सिमेंटची जंगले वाढत आहे आणि नैसर्गिक जंगले नष्ट होत आहे. याचा परिणाम निसर्गचक्रावर उदा. अवकाळी पाऊस, उष्णतेची लाटहोत आहे. जर आपल्याला आपली पृथ्वी पुढच्या पिढीसाठी राहण्यायोग्य ठेवायची असेल, तर 'एक तरी झाड लावा' हा संकल्प करणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी मिळून जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत आणि त्यांचे जतन केले पाहिजे.
 

वृक्षारोपण म्हणजे काय?

वृक्षारोपण म्हणजे मोकळ्या जागेत किंवा योग्य ठिकाणी झाडे लावणे आणि त्यांची जोपासना करणे. केवळ रोपे लावणे म्हणजे वृक्षारोपण नव्हे, तर ती झाडे मोठी होईपर्यंत त्यांचे संगोपन करणे ही खरी जबाबदारी आहे.
 

वृक्षारोपणाचे महत्त्व

झाडे आपल्या जीवनात अनन्यसाधारण भूमिका बजावतात. झाडे दिवसा कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन बाहेर सोडतात. म्हणूनच झाडांना 'पृथ्वीची फुप्फुसे' म्हटले जाते. तसेच वाढत्या वाहनांमुळे आणि कारखान्यांमुळे होणारे वायू प्रदूषण कमी करण्याचे काम झाडे करतात. ती हवेतील धुलीकण शोषून हवा शुद्ध ठेवतात. सध्या पृथ्वीचे तापमान झपाट्याने वाढत आहे. वृक्षारोपण केल्यामुळे पर्यावरणात गारवा राहतो आणि जागतिक तापमान वाढीवर नियंत्रण मिळवता येते. तसेच झाडांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात. यामुळे पावसाच्या पाण्याने होणारी जमिनीची धूप थांबते आणि जमिनीचा कस टिकून राहतो. झाडांमुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगवान होते, ज्यामुळे ढग थंड होऊन पाऊस पडण्यास मदत होते. ज्या भागात जंगले जास्त आहे, तिथे पावसाचे प्रमाणही चांगले असते. तसेच झाडे ही अनेक पशू-पक्ष्यांचे घर असतात. जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी झाडे असणे अत्यंत आवश्यक आहे. 

मानवी जीवनातील उपयोग

*झाडे आपल्याला केवळ हवाच देत नाहीत, तर मानवाच्या अनेक मूलभूत गरजा पूर्ण करतात. 
*फळे आणि अन्न: मानवाला आणि प्राण्यांना अन्नाचा मोठा भाग झाडांपासून मिळतो.
*औषधी उपयोग: कडुनिंब, तुळस, कोरफड यांसारखी अनेक झाडे औषधी म्हणून वापरली जातात.
*कच्चा माल: लाकूड, कागद, रबर आणि डिंक यांसारख्या वस्तू झाडांपासूनच मिळतात.
Edited By- Dhanashri Naik