मंगळवार, 7 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 एप्रिल 2026 (12:16 IST)

तारक मेहता फेम दयाबेनच्या वडिलांचे निधन

disha vakani father bheem vakani  death
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीचे वडील आणि ज्येष्ठ गुजराती अभिनेते भीम वकानी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले आहे. ते एक ज्येष्ठ कलाकार होते आणि त्यांनी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत आपल्या मुलीसोबत 'मावजी छेदा' ही भूमिका साकारली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, भीम वकानी यांचे निधन अचानक झाले असून, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते गुजराती रंगभूमी आणि चित्रपटांमधील एक ज्येष्ठ अभिनेते होते. त्यांनी आमिर खानच्या 'लगान' या चित्रपटातही काम केले होते.  त्यांच्यावर अहमदाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 'तारक मेहता' परिवार आणि चाहत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
Edited By- Dhanashri Naik