अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी; बाबा सिद्दीकीच्या मारेकऱ्याचे नाव समोर आले
बॉलिवूडमधील कलाकारांना धमक्या मिळण्याचे सत्र सुरूच आहे. आता अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पोलीस सूत्रांनुसार, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी झीशान अख्तर याने ही धमकी दिली आहे. ही धमकी खरोखर अख्तरकडून आली आहे की कोणीतरी त्याच्या नावाचा वापर करत आहे, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. मात्र, खानला मिळालेली धमकी नक्की झीशाननेच दिली आहे का, याची अधिकृत पुष्टी पोलिसांनी अजून केलेली नाही.
एका अधिकार्याने सांगितले की, यापूर्वी तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांनाही अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्या प्रकरणात पोलिसांनी बेंगळुरू येथील ३० वर्षीय वैभव मिश्रा याला अटक केली होती, जो आयआयटी पदवीधर आहे. त्याने या धमक्या देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर केल्याचा आरोप आहे. अधिकार्याने स्पष्ट केले की, मिश्राचा कोणत्याही गुन्हेगारी टोळीशी कोणताही संबंध नाही.

