1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 20 मे 2025 (11:39 IST)

‘वॉर 2’ चा टीझर प्रदर्शित; ऋतिक रोशन आणि एनटीआर च्या टक्करने वाढवली उत्सुकता!

WAR 2 Official Teaser Hrithik Roshan NTR Kiara Advani Ayan Mukerji YRF Spy Universe
काही दिवसांपूर्वी ऋतिक रोशनने सांगितलं होतं की यंदाचा एनटीआर चा वाढदिवस स्फोटक ठरणार आहे – आणि त्याचं वचन आज पूर्ण झालं! वायआरएफच्या स्पाय युनिव्हर्समधील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपट ‘वॉर 2’ चा टीझर आज रिलीज करण्यात आला आहे.
 
अयान मुखर्जी दिग्दर्शित या अ‍ॅक्शन थ्रिलरमध्ये ऋतिक रोशन, एनटीआर आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही बहुभाषिक फिल्म १४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.
 
‘वॉर 2’ ही YRF स्पाय युनिव्हर्समधील सहावी फिल्म असून, या फ्रँचायझीमधील सर्व चित्रपट — ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘वॉर’, ‘पठाण’, आणि ‘टायगर ३’ — हे सुपरहिट ठरले आहेत.
 
टीझरमध्ये धमाकेदार अ‍ॅक्शन, प्रचंड थ्रिल आणि ऋतिक-एनटीआर यांची तगडी भिडंत पाहायला मिळते, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.