युरोपमधील सर्वात नेत्रदीपक पर्यटन स्थळांपैकी एक Disneyland Theme Park
International Tourism : डिस्नेलँड थीम पार्क हे पर्यटन स्थळ युरोपमधील सर्वात नेत्रदीपक ठिकाणांपैकी एक मानले जाते. हे लहान मुले आणि प्रौढ दोघांचेही आवडते ठिकाण आहे. जर तुम्ही युरोपच्या सहलीची योजना आखत असाल किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही याचा तुमच्या प्रवासाच्या यादीत नक्कीच समावेश करा.
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये असलेले डिस्नेलँड हे एक बेस्ट पर्यटनस्थळ आहे. केवळ लहान मुलेच नव्हे, तर प्रौढसुद्धा डिस्नेलँडचा आनंद घेण्यासाठी जगभरातून येतात. डिस्नेलँड थीम पार्क १९९२ मध्ये सुरू झाले आणि तेव्हापासून लाखो लोकांनी येथे भेट दिली आहे. डिस्नेलँडमध्ये दोन मुख्य थीम पार्क आहे डिस्नेलँड पार्क आणि वॉल्ट डिस्नी स्टुडिओ पार्क. येथे भेट दिल्यावर तुम्हाला एखाद्या जादुई दुनियेत प्रवेश केल्यासारखे वाटेल.
तसेच स्लीपिंग ब्युटी कॅसल हे डिस्नेलँडमधील सर्वात मोठे आकर्षण आहे. याव्यतिरिक्त, ॲडव्हेंचर आयलँड, फँटसीलँड आणि डिस्कव्हरीलँड सर्व वयोगटातील लोकांना आकर्षित करतात. पायरेट्स ऑफ द कॅरिबियन आणि स्टार वॉर्स हायपरस्पेस माउंटन यांसारख्या राईड्स थरार-प्रेमींसाठी खास तयार केल्या आहे या राईड्सचा आनंद घेणे हा स्वतःच एक अनोखा अनुभव आहे. वॉल्ट डिस्ने स्टुडिओज पार्कमध्ये, तुम्ही चित्रपटांमागील जादू अनुभवू शकता.
डिस्नेलँड हे एक स्वतःचेच जग आहे, जे तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवते. येथे, तुम्ही डिस्ने-थीम असलेली हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पाहू शकता, तसेच शॉपिंग व्हिलेजला भेट देऊन खरेदी करू शकता. येथील प्रत्येक गोष्ट उच्च दर्जाची आहे. जर तुम्ही युरोपच्या सहलीची योजना आखत असाल, तर तुमच्या लिस्टमध्ये डिस्नेलँडचा समावेश करा. दिवसभर फिरल्यानंतर, तुम्ही रात्री नेत्रदीपक आतषबाजीचा आनंद घेऊ शकता.