बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर जादूटोणा, फोडलेले नारळ, फुलं, हळद-कंकू, कापलेले लिंबू आढळले
राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर नारळ, फुलं, हळद कुंकू, कापलेले लिंबू, आणि नैवेद्य अशा वस्तू आढळल्या असून या ठिकाणी अघोरी पुजस करून जादूटोणा केल्याचे समोर आले आहे. बारामतीत सध्या याची चर्चा सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीत अजित पवार यांच्या घराजवळ रस्त्यावर आणि फुटपाथावर जादूटोणा करत अघोरी पूजा केल्याचा प्रकार आढळला आहे. त्यांच्या जवळच्या सोसायटीतील काही जण सकाळी मॉर्निग वॉक ला गेले असता त्यांना अजित पवारांच्या घराजवळ रस्त्यावर हळद-कुंकू, फोडलेले नारळ, कापलेले लिंबू , नैवेद्य ठेवलेले दिसले. काही नागरिकांनी हे सर्व साहित्य बाजूला केले.
हा सर्व प्रकार अघोरी असून जादू टोणा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बारामतीत घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी शोध सुरु केला आहे. हा अघोरी प्रकार कोणी केला, याचा मागे करणाऱ्याचा हेतू काय आहे याचा तपास पोलीस लावत आहे.